Friday 2 June 2017

श्री रामेश्वर मंदिर .....भिरवंडे !!!

https://plus.google.com/u/0/105323052910586677719
 
  पुर्वाधि काळापासून ते आजतगायत भिरवंडेकर सावंत (पटेल) धार पवार हे समजामध्ये अभिमानाने ओळखले जात आहेत. भिरवंडे सावंत (पटेल) या नावामागेही प्रचंड पूर्व इतिहास आहे. येणार्या नव्या जमान्यात पूर्व इतिहासाची जाणीव पुसट होऊ लागल्याने आज सावंत (पटेल) धार पवार या समज्याच्या बाधवांनी एकत्र येवून धारपवार (परमवांशीय) सावंत-पटेल उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग याची स्थापना केलेली आहे. धारपवार सावंत-पटेल या समाजाच्या पूर्व इतिहासाची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी त्यामध्ये प्रत्येक गावाच्या इतिहासाची माहिती समाजातील लोकांना व्हावी यासाती ज्यांना ज्यांना याबाबतची माहिती, कागदपत्रे याचे ज्ञान आहे. त्यांनी ती माहिती समाजाच्या माहितीसाठी प्रसिद्द करणे आवश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. भिरवंडेकर सावंत पटेल त्यांचे देव याबाबतीची काही माहिती व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच आहे.

) सावंत (पटेल) धार पवार यांचा पूर्व इतिहास पाहता सावंत (पटेल) धारपावर हे परमार या राजपूत वंशाचे आहेत. सावंत (पटेल) हे भोजराजाचे वंशज आहेत. भोज राजा हा प्रसिद्ध पराक्रमी विव्दान राजा होता. त्याच्या वंशाचा इतिहास मुळातच बलाढ्य अलौकिक तसेच पराक्रमी असा आहे. त्यामुळे या समाजाच्या पुढच्या पिढयाही त्याच प्रकारच्या निर्माण झालेल्या आहेत. आपल्या कुळाचा पूर्व इतिहास हा स्फूर्तिदायक अभिमान वाटावा असा असेल. तर त्याची आठवण पिढीला जनत करणे तेवढेच आवश्यक आहे त्यामुळे त्यापासून त्यांना प्रेरणा मिळेल. त्यांचा उत्साह वाढत जाईल. भिरवंडेकर सावंत पटेल (धारपवार) हे पाराशर गोत्रि असून यांचे आराध्य दैवत शिवशक्ती आहे. देव ब्रम्ह्देव आराध्य वृक्ष (कूळ) पळस आहे. सावंत (पटेल) हे राजस्थानमधून मध्य प्रदेशात धार या संस्थानातून फोंडा मार्गे कोकणात आले. त्यानंतर पुढे त्यांनी सह्याद्रीचा भाग त्याच्या पायथ्याशी असलेल्या चौदा गावे यामध्ये आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. त्यांनी सदर प्रदेशाच्या मध्यभागी असलेल्या नाटळ , ता. कणकवली या गावी आपला तळ ठेवला स्वत:चे निशाण ध्वजस्तंभ रोवला. त्यानंतर त्यतिकाणी तळ खांब देवालय बांधले. पुढे सदरच्या नाटळ ता. कणकवली येथील याच तळखांबास चौधरा (चौदा गावचे सत्तस्थान) असे म्हटले जाऊ लागले. या तळ खांबाच्या देवालयजवळ मूळ पुरूष लखम सावंत यांची समाधी आहे. सावंत वंशाचा मूळ पुरूष लखम सावंत यांचे चौदा गावात विखुरलेल्या सावंत पटेल धार पवार या वंशजांकडून दर तीन वर्षानी या चौधरा देवस्थानची समाराधना एकत्रितपणे केली जाते. श्री तळखांब चौधरा या देवस्थानच्या समाराधनेसाठी इतर गावांनी या गावाचे श्री. राम सावंत यांचकडे पाटवायच्या साहित्याच्या उल्लेख असलेले आज्ञापत्र ही त्या काळात देण्यात आले होते ते उपलब्ध आहे. याच चौदा गावांमध्ये इतर ठिकाणीही सावंत (पटेल) धार पवार यांचे मूळ पुरूष लखम सावंत वंशज विखुरलेले आहेत. सावंत पटेल धार पवार यांच्या मूळ पुरूष भान सावंत यांना भिरवंडे हे गाव वसाहतीसाठी मिळाले. त्यामुळे आजच्या भिरवंडे सावंत यांचे मूळ पुरूष हे भान सावंत होय. त्यानंतर भान सावंत यांच्या वंशातील श्री. भान सावंत यांस श्री. किट सावंत यांस पुनाळ, श्री. कूक सावंत, यांस बिवने, श्री भान सावंत यांस खलांतर, यांस श्री लखम सावंत यांस जांभुळ भाटले या विभागात सावंत पटेल हे रहिवास मिळाले त्या त्या वकळांचे मूळ पुरूष मानले जातात.

) पेशवाई काळापासून भिरवंडेकर एकशे आठ पालखीचे सरदार होते,अशा प्रकारची कागदपत्रे आहेत.

) भिरवंडे हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कणकवली तालुक्यातमध्ये पूर्व देशेस सह्याद्री पर्वतरंगांमध्ये वसलेले आहे. सह्याद्रीच्या पच्चिम घाटातील पार्वत रांगामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या पच्चिम सरहद्दिवर भिरवंडे हे गाव स्थित आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेच्या उत्तर पूर्वेस सुमारे कि. मी. मुख्य रांग आहे तीमानगाया नावाने ज्ञात आहे. या सह्याद्रीच्या रंगेच्या उत्तरेलाहावळेशिकर, ईशान्येलालगौरीशिखर पूर्वेलामुडाशिखर या मुख्य रांगेस काटकोन करणार्या तीन रांगा सुमारे अडीच ते तीन कि. मी. पूर्व पच्चिम पसरलेल्या आहेत. त्यामुळे बनलेल्या तीन खोर्यात भिरवंडे हे गाव वसलेले आहे. भिरवंडे हे गाव या दर्याखोर्यात वसलेले असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी काड्या- कपर्यातून धो धो वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे हे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. त्या काळात भिरवंडे हे संपूर्ण गाव हा हिव्यागार झाडी झूडपाणी फलांनी बहरलेला असतो. त्यामुळे हे सृष्टी सौंदर्य पर्यटकांचे मन वेधु घेतल्याशिवाय राहत नाही. कणकवली या तालुक्याच्या ठिकणपासून भिरवंडे हे गाव साधारण: १८ कि. मी. अंतरावर आहे. भिरवंडे या गावाला बाजार पेठेचे ठिकाण सांगवे गावातील कनेडी हे आहे. भिरवंडे गावात जाण्यासाठी कणकवली येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस सेवा उपलब्ध आहेत. तसेच कनेडी या ठिकाणहून रिक्षा सुविधाही उपलब्ध आहेत. भिरवंडे गावामध्ये प्रवेश करत असतानाच सांगवे-भिरवंडे या गावाच्या सीमेवर आत्यंत निसर्गरम्य मातोश्री वृद्धाश्रमाच्या वास्तू उभारलेल्या आहेत तसेच त्याच टिकणी पाऊल टाकतच क्षणी गणपतीचे संगमारावरामधील एक सुंदर मन वेधून घेणारे असे मंदिर-ईमारती, पूर्वीच्या जुन्या पद्धतीची घरे सुद्धा आपले मन वेधून घेणारी आहेत.

) भिरवंडे त्यांचे लगतचे सांगवे ही मूळ एकाच कुटुंबातील व्यक्तिंची गावे आहेत. ज्यावेळी भान सावंत यास भिरवंडे हे गाव वसाहतीसाठी मिळाले त्यावेळी त्यांचे भाऊ सोम सावंत देव सावंत यांना सांगवे हे गाव वसाहतीसाठी मिळालेले आहेत. त्यामुळे अद्यापपर्यंत सांगवे भिरवंडे या गावातील गाव रहाटी ही एकच असून गाव रहाटीचे देवस्थाने ही एकत्रित आहेत.

सांगवे भिरवंडे या गावाचे गाव रहाटीचे पंचायतनामध्ये सांगवे गावामध्ये
) लिंग रामेश्वर
) महालक्ष्मी
) गांगो
) दिर्बादेवी
) चव्हाटा
) बेळोपान
) जैन ब्राह्मण ही देवस्थाने आहेत.

तर भिरवंडे गावामध्ये
) रामेश्वर
) रुई
) गांगो
) रवळनाथ
) होळदेव
) विठलाई
) मेळेकार ही जागृत देवस्थाने आहेत.

  भिरवंडेकर सावंत पटेलांच्या लग्न कार्यात इतर प्रसंगी भिरवंडे येथील सात सांगवे येथील सात स्थळांचे (दैवतांचे) स्मरण श्रीफळे अर्पण केली जातात. या गवरहाटीच्या देवस्थणाखेरीज भिरवंडे गावामध्ये बिवनेवाडी या ठिकाणी मराठे या ब्राह्मणांचे दत्तमंडिर , जांभळभातले या ठिकाणी कै. बाळा सावंत यांचे दत्त मंदिर , मुरवडे या ठिकाणी श्री गाडेश्वर मंदिर, हनुमानवाडी या ठिकाणी हनुमान मंदिर , परतकामवाडी या ठिकाणी हनुमान मंदिर समाधी पुरूष मंदिर अशी देवस्थाने आहेत. सावंत पटेल धारपवार हे शिव शक्तीचे उपासक आहेत. त्यामुळे शिवस्वरुप रामेश्वर देवता शक्ति स्वरुप भवानी दिर्बादेवी या देवतांची पूजा होऊ लागली. सांगवेकर भिरवंडेकर , सावंत पटेल यांची एकत्रित असलेली देवस्थाने चालविण्यासाठी काही नियम,रूढी,प्रथा, परंपरा या पुर्वाधिकाळापासुन निश्चित केल्या गेल्या आहेत. या अलिखित रूढी प्रतांचे आधारे आजतागायत हा गावरहाटीचे देवस्थानाचे व्यवहार हे गुण्यागोविंदाने चालत आहेत. ही एक महत्वपूर्ण बाब आहे.

) सांगवे भिरवंडे या गावातील गावरहाटितित वर नमूद सर्व देवस्थाने आहेत. सांगवे येथील दिर्बादेवी ही माहेरवासिणीच्या हाकेला धावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. दिर्बादेवीच्या मंदिरामध्ये भवानी देवी स्थित आहे. भिरवंडेकर सावंतांच्या घरी देवीच्या गोंधळाची प्रथा नाही. मात्र दर तीन वर्षानी देवीच्या मंदिरमध्ये सर्व भिरवंडेकर उपस्थित रहात असतात. तसेच खरेपाट्ण जवळच्या पियाळि नदीपासून कणकवली येथील गडनदिपर्यंत आणि सह्याद्रीच्या पायथ्याच्या कुंभवडे, ता. ककणवली या गावापासून आचार-कुनकेश्र्वर- देवगड या अरबी समुद्रपर्यंतचि चौर्याऐन्शि खेडी तथा देवस्थानणे ही गाव मौजखेडी तथा देवस्थाने ही गाव मौजे साळशि ता. देवगड येथील श्री देव सिद्धेश्र्वर श्रीदेवी पावणाई या देवस्थानांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे या देवस्थानांना चौर्याऐन्शि खेड्यांचा अधीपाटी म्हणून संबोधले जाते. या श्रीदेवी सिद्धेश्र्वर श्रीदेवी पावणाई इनाम देवस्थानांच्या अधिपत्याखाली भिरवंडे सांगवे गावातील रामेश्र्वर दिर्बादेवी ही देवस्थाने येतात. भिरवंडेकर सांगवेकर याची दिर्बादेवी ही तिच्या आदेशाप्रमाणे महशिवरात्रिला आपल्या कुणकेश्र्वरला लवाजम्यानिशी समुद्र स्नानाला जात असत. त्यावेळी दिर्बादेवी ही गाव मौजे साळशी येथील देव सिद्धेश्र्वर श्रीदेवी पावणाई यांच्या देवगड तालुक्यातील निश्चित केलेल्या जागेवरून शेव देवून कुणकेश्र्वराचे भेटीला प्रस्थान करीत असत. सदरचा सोहळा हा अवर्णनीय असाच असे. असे जाणकार सांगतात. त्यांची गावातील सर्व लोकांना माहिती असणे ही काळाची गरज आहे. अन्यथा काळाचेच ओघात ह्या रीती, रूढी, परंपरा, संस्कार. . नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

) भिरवंडे गावास नैसर्गिक दृष्टीने लाभलेले भौगोलीक स्थान, भिरवंडे गाव सीमेवर असलेल मातोश्री वृद्धाश्रम, जागृत पुरतं स्थापत्ये कलेचा अविष्कार असलेली मंदिरे, रामेश्र्वर मंदिर, भक्त निवास, बाग बगिचा निसर्गसौंदर्य, डोंगर, नद्द्या यामुळे गावाला एक आगळे वेगळे वैभव लाभलेले आहे. मुळात कोणत्याही गावाची ओळख ही त्या गावातील आर्थिक सामाजिक राजकीय स्थितीवर अवलंबुन असते. आज भिरवंडे गावाने खासदार, आमदार, जिल्हा परिषद, अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, महापौर त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातिल गाजवणारे अनेक व्यक्तिमत्त्वे दिलेली आहेत. ज्या गावाचा इतिहास बलाढ्य ते गावही तेवढे मोठे आणि लौकिकास पात्र असते. भिरवंडे हे गाव अशाच इतिहासाची साक्ष देणारे धारपवार सावंत पटेलांच्या पूर्वजांनी वसवले आज शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेले आहे. शतकापुर्वी शाळेची मुहुर्तमेढ रोवली स्वत:ला ज्ञानी केले. भिरवंडेकरांची शिक्षणाबद्दल असलेली आस्था पाहून ब्रिटीश शासनाने सुद्धा पुढारलेले आहे. शतकापुर्वी शाळेची मुहुर्तमेढ रोवली स्वत:ला ज्ञानी केले. भिरवंडेकारांची शिक्षणाबद्दल असलेली आस्था पाहून ब्रिटीश शासनाने सुद्धा या गावात सन १९२१ मध्ये ते इयत्तांचे स्पेशल इंग्रजीचे वर्ग सुरू केले होते. ही गोष्ट चा भिरवंडेकर यांना भूषणावह आहे. हा ज्ञानाचा वारसा पुढील पुढयांनीही आखंड ठेवलेला आहे म्हणून आज लष्कर वकील, इंजिनीयरींग, डॉक्टर, राजकारण, समाजकारण, शिक्षण, प्राध्यापक, बँकर्स, उद्द्योजक, संगीत या स्वरूपाच्या अनेक क्षेत्रात भिरवंडे गावची मुले मुली आज मोठा हुद्द्यावर काम करताना दिसून येत आहे. हे परिवर्तन हे शिक्षण असलेल्या श्रद्धेपोटी आहे. या गावाच्या लोकांची श्रद्धा ही आपल्या गावावर, आपल्या देवावर आहे. तसेच ती सरस्वतीवर आहे. त्यामुळे भिरवंडे गावातील रामेश्र्वर मंदिरमध्ये होणारे दहिकाला, दसरा होळी, सप्ताह, नवरात्री, गोंधळ इत्यादी अनेक उत्सव इतर ठिकाणी होणार्या उत्सवांना भिरवंडेकर सावंत, यांचे पैपाहुणे मोठया संख्येने उपस्थित राहुन उत्सवाचा आनंद द्विगुणीत करीत असतात. आमच्या गाव हा आमच्या देवता रामेश्र्वर दिर्बादेवी पंचायतनातील सर्व देवतांच्या कृपे आशिर्वादाने सुखी समाधानी प्रगतिशील आहे. त्यामुळे आताच्या कलियुगात गाव देव यांची जुजबी माहिती व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच आहे. अशीच उत्तरोत्तर गावाची प्रगती होत राहो हीच सदिच्छा !

भिरंवडे मूळपुरुष: भान सावंत
कुलदैवत: तुळजा भवानी
कुलदेवी: कालिका माता
ग्राम देवी: दिर्बादेवी
गोत्र: पराशर
आराध्यदैवत: शिव-शक्ती
आराध्य वृक्ष: पळस
सावंत वंशज मूळपुरुष: लखम सावंत